पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर होणार इतिहासजमा

पुणे – पुणे शहरातील महत्वाचं मानल जाणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराचे पुनर्निर्माण करण्याचे पुणे महानगरपालिकेने निश्चित केले आहे, रंगमंदिराची जुनी इमारत पाडून त्याठिकाणी नव्याने नाट्यगृहाची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. तसेच रंगमंदिराच्या आवारात आता मेट्रोचे स्टेशन ही होणार आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये त्यासाठी १० कोटी रुपयांची मंजुरीही देण्यात आली होती.

सध्याच्या रंगमंदिराचे भूमिपूजन ८ ऑक्टोबर १९६२ रोजी झाले होते तर उद्घाटन हे 26 जून 1968 मध्ये तत्कालीन गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. रंगमंदिराच्या आवारात आता मेट्रोचे स्टेशन ही होणार आहे. त्यामुळे सध्याचे बालगंधर्व रंगमंदिर लवकरच इतिहासजमा होणार आहे. पुणे महानगरपालिकेने बालगंधर्वचे पुनर्निर्माण हे नवीन तरतुदीनुसार काळानुरूप करण्याचे योजिले आहे.