ट्रक चालकाला मारहाण करुन लुटणाऱ्या दोघांचा जामीन अर्ज फेटाळला

औरंगाबाद : ट्रक चालकाला मारहाण करुन लुटल्याप्रकरणी आरोपी सलमान उस्‍मान शाह (२२) आणि सद्दाम गुलाब शाह (२४, दोघे रा. शरणापुर ता.जि. औरंगाबाद) या दोघांनी सादर केलेला नियमीत जामीन अर्ज प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी सोमवारी दि.१४ फेटाळला.

प्रकरणात ट्रक चालक पंकज गंगा जैस्वाल (२४, रा. अरंगी जि. चंदोली उत्‍तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, जैस्‍वाल हे ५ जून रोजी दुपारी जालना येथून ट्रकने (क्रं. एमएच-१९-झेड-३०६५) लोखंडी सळ्या नाशीक येथे घेवून जात होते. साजापूर फाट्याकडून शरणापूर फाट्याकडे यत असतांना शरणापूर शिवारातील एका हॉटेल जवळ एका दुचाकी आलेल्या तिघांनी जैस्‍वाल यांचा ट्रक अडवून त्‍यांना मारहाण केली. तसेच जीवे मारण्‍याची धमकी देत त्‍यांच्‍या जवळील गाडी भाड्याचे १७ हजार रुपये बळजबरी हिसकावून घेतले. प्रकरणात दौलताबाद पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. गुन्‍ह्यात यापूर्वी एका आरोपीला अटक करण्‍यात आली होती.

वरील दोघा आरोपींना १० जून रोजी अटक करण्‍यात आली तर न्‍यायालाने त्‍यांना आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने आरोपींना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता न्‍यायालयाने त्‍यांची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्‍यानंतर आरोपींनी नियमीत जामीनीसाठी अर्ज सादर केला होता. प्रकरणात सहायक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी काम पाहिले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP