बागल गटाने माझ्या खेटराची सुद्धा बरोबरी करु नये : जयवंतराव जगताप

करमाळा : ज्या बागलांच्या राजकारणाचा जन्मच माझ्या करंगळीला धरून झाला , ज्यानी दुसऱ्याचा मकाई कारखाना हिसकावून घेतला व स्वतःच्या बापाचा पुतळा तिथं बांधला अशा लोकांनी माझ्या वडिलांच्या पुतळ्याच्या अनावरणाची भाषा करू नये त्यांनी माझ्या खेटराची सुद्धा बरोबरी करु नये असं म्हणत बाजार समितीचे सभापती आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी बागल गटावर घणाघाती टीका केली आहे. करमाळा तालुक्यातील कंदर या ठिकाणी झालेल्या सभेत त्यांनी ही टीका केली आहे.

करमाळा तालुक्यात बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू असून सत्ताधारी जगताप गटाबरोबर आमदार पाटील तसेच मोहिते पाटील गटाने युती केली आहे.तर या युती समोर बागल आणि संजय शिंदे यांच्या गटाने आव्हान निर्माण केल्याने सध्या तिरंगी लढत पहायला मिळत आहे.प्रचारात जगताप गटाने आघाडी घेतली असून सभांना देखील मोठी गर्दी पहायला मिळत आहे. विद्यमान आमदार नारायण पाटील, खा.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने जयवंतराव जगताप यांच्या सोबत युती केल्याने या तिघांच्या देशभक्त कै. नामदेवराव जगताप शेतकरी विकास पॅनलचा विजय निश्चित मानला जात आहे.

यावेळी कदम रावसो यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दत्तात्रय भागडे यांनी सुत्रसंचलन यावेळी उमेदवार दादासाहेब पाटील, शब्बीर मुलाणी, विजय नवले, विठ्ठल तळे, हरिभाऊ मंगवडे, तळेकर,विद्यमान आमदार नारायण आबा पाटील , मा. आ. जयवंतराव जगताप आदींची भाषणे झाली. य सभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक दस्तगीर मुलाणी हे होते. यावेळी व्यासपिठावर विदयमान आमदार नारायण आबा पाटील, पॅनल प्रमूख व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमूख,सभापतीप. स. शेखर गाडे, केमचे सरपंच अजित तळेकर,प.स. सदस्य दत्ता सरडे,महेश चिवटे, महादेव आबा रोकडे, दिनकर रोकडे, धनंजय गायकवाड,राजकुमार देशमूख, मौला मुलाणी, बाळासाहेब काळे, सरपंच रामभाऊ नलवडे ,अरूण यादव, महादेव डूबल,युवा नेते पृथ्वीराज पाटील, वैजिनाथ कदम, सागर दोंड,रामेश्वर तळेकर, नितीन हिवरे, , रावसाहेब भांगे, दशरथ दडस, नामदेव पाटील, आदी उपस्थित होते.

जयवंतराव जगताप यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –

करमाळा तालुक्याच्या विकासाची तळमळ होती म्हणून देशभक्त नामदेवराव जगताप यांनी भीमा नदी अडवुन १९७२ला दौंड जवळ     होणारे ‘ उजनी ‘ धरण स्वतःची राजकीय ताकद वापरून बांधले यामूळेच या भागाचा म्हणजेच सोलापूर जिल्ह्याचाच कायापालट झाला     अन् आजचे नंदनवन फुललेले दिसतेय.
– विरोधकावंर शेकडो भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. शामल बागल आमदार असताना तालुक्यातील रस्त्यांची वाट लावली.
– वीजेच्या प्रश्नाचा, पाण्याच्या प्रश्नाचा आवाज त्यांना उठवता आला नाही म्हणून तालुका विकासाच्या बॅकफुटला गेला.
– नारायण आबाचा न् माझा १९८२ चा दोस्ताना आहे.सामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटीबध्द     आहोत.
– २००४ साली आदिनाथचा चेअरमन असताना जिल्हयात सर्वाधिक १२०१ रु. भाव दिला.डीसीसी बँकेचा पारदर्शक कारभार केला आहे   अन् करत आहे.
– बागलांनी शेतकऱ्यांचे साखर कारखाने स्वतःच्या स्वार्थासाठी डबघाईला आणून दयनीय अवस्था केली आहे.
– लोकांना गळ्यात पडून रडून भावनीक करून ते दबावाचे राजकारण करत आहेत. दोन वर्षाचा पगार कामगारांचा थकवला आहे. त्यांचे संसार उध्वस्त केले आहेत.
– बाजार समितीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कामं केलेली आहेत. भविष्यात या भागासाठी मासळी मार्केट, केळी रायपनींग सेंटर, कोल्ड स्टोअरेज सेंटर , फळ प्रकिया केंद्र, इ.उभारणार आहे.