नवी दिल्ली : कोरोन काळात आधीच अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. दरम्यान अनेकांच्या पगारात देखील कपात करण्यात आली होती त्यानंतर आता प्रसिद्ध कार कंपनी जग्वार लॅंड रोव्हर(जेएलआर) आपल्या कर्मचारी संख्येत कपात करणार असून, एकूण 2 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करणार असल्याचे कंपनीने बुधवारी घोषित केले.
यामध्ये, संस्थात्मक समीक्षामुळे ताशी वेतन आणि उत्पादन कर्मचार्यांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. टाटा मोटर्स ऑफ इंडियाच्या मालकीच्या जेएलआरने याआधीच सांगितले होते की, येत्या पाच वर्षांत 2024 पर्यंत त्यांचे लँड रोव्हर ब्रँड पूर्णपणे इलेक्ट्रिक होईल आणि ईव्हीस लाँच करण्यास सुरवात करेल.
तसेच कंपनीने दुसरीकडे लग्जरी जग्वार ब्रँडची घोषणाही केली आहे. कंपनीच्या सर्व गाड्या 2025 पर्यंत इलेक्ट्रिक होणार असून, 2030 पर्यंत हे सर्व ई-मॉडेल लाँच केले जातील, असे जग्वार कंपनीने स्पष्ट केले आहे. जग्वार लँड रोव्हर कंपनीच्या सर्व कामकाजाचा आढावा घेत असून पुढील आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये कंपनी जवळपास 2 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीत कपात करणार असल्याचे कंपनीने एक मेलमध्ये म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबातील निकालांमुळे भाजपला धक्का; अमित शहांनी घेतली तातडीची बैठक
- बेकरी व्यवसायिकाला लुटणारे तिघे गजाआड
- ‘मौत का कुआँ’ बनलेल्या ‘त्या’ विहिरीजवळ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचेही काम सुरू
- शुद्धीवर न आलेल्या महिलेची आखेर ओळख पटली; गुढ मात्र कायम
- ‘चिनीसैन्य माघार घेत असल्याचा उत्सव म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेची बनवाबनवीच’