अयोध्याप्रकरणाची सुनावणी पूर्ण पण निकाल १५ नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवला.

court

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या चाळीस दिवसांपासून सुरु असेलेली अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी आज पूर्ण झाली. मात्र न्यायालयाने या खटल्याचा निकाल राखून ठेवला आहे. सुनावणी पूर्ण झाली असली तरी निर्णयासाठी न्यायाधीशांना वेळ हवा आहे. त्यामुळे येत्या १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस.ए. नजीर यांच्या खंडपीठासमोर या खटल्याची सुनावणी सुरु होती. यांनी १८ ऑक्टोबर पर्यंत दोन्ही पक्षाच्या वकिलांना सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. आज या प्रकरणाची अंतिम सुनावणी पूर्ण झाली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये कलम १४४ अंतर्गत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. तर १० डिसेंबर पर्यंत शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत.

आजच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात गदारोळ झाला. मुस्लीम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी युक्तिवादासाठी लागणारा अयोध्या जागे संबधीचा नकाशा फाडला. राम मंदिरवर हिंदू महासभेच्या वकिलांनी ऑक्सफोर्ड पुस्तकातील नकाशाचा हवाला दिला. यावेळी मुस्लीम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी या पुस्तकाचा नकाशा फाडला. त्यामुळे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘जर असेल होत असेल तर आम्ही उठून जाऊ.’ त्यामुळे आजच्या युक्तिवादाला नाट्यमय रुपांतर आले होते. तर मुस्लीम पक्षाच्या मध्यस्थ पॅनल सुन्नी वक्फ बोर्डाने विवादित जमिनीच्या बदल्यात दुसरीकडे जागा मिळण्याबाबत सहमत आहे. अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र न्यायालयाने याबाबत अद्याप कोटीही पुष्टी दिली नाही.

महत्त्वाच्या बातम्या :