fbpx

स्मृती इराणींच्या हस्ते पुरस्कार स्विकारल्याने त्याची किंमत कमी होत नाही ! नानांनी फटकारले

Nana-Patekar

पुणे: स्मृती इराणी यांच्या हस्ते स्वीकारण्यात गैर नाही त्यामुळं काही पुरस्काराची किंमत कमी होत नाही, असे नाना पाटेकर यांनी कलाकारांना फटकारले.

राजधानीत गुरूवारी होऊ घातलेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा कलाकारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वादात सापडला होता. यंदा या पुरस्कार सोहळ्यात काही विजेत्यांना राष्ट्रपतींच्याऐवजी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

केवळ ११ पुरस्कार विजेत्यांनाच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयाला विजेत्या कलाकारांनी विरोध केला आहे. आम्ही राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार स्वीकारू, अन्यथा सोहळ्यावर बहिष्कार टाकू, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी स्मृती इराणी यांच्या हस्ते स्वीकारण्यात गैर नाही त्यामुळं काही पुरस्काराची किंमत कमी होत नाही. ‘मला तीन राष्ट्रपती पुरस्कार राष्ट्रपतींच्याच हस्ते मिळाले आहेत. जर राष्ट्रपती पुरस्कार त्यांच्याच हस्ते मिळाला नाही तर नाराज होणं स्वाभाविक आहे. मात्र स्मृती इराणी यांच्या हस्ते स्वीकारण्यात गैर नाही. त्यामुळं पुरस्काराची किंमत कमी होत नाही’. असे स्पष्ट केले.