मला मिळालेल्या अधिकाराचा वापर जनतेसाठी करीत आलो- डॉ.पुरुषोत्तम भापकर

औरंगाबाद : डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी हास्यकवी डॉ. विष्णू सुरासे यांनी घेतलेल्या मुलाखतीत विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. महापालिकेत ११५ नगरसेवक असतात. पण आयुक्त एकच असतो. आज मी विभागीय आयुक्त आहे. पण मराठवाड्यात खासदार-आमदार अनेक आहेत. मला कुणी गॉड फादर नाही. मनाला, बुद्धीला जे पटते ती माझी विचारधारा राहिली. मला जो अधिकार मिळाला, त्याचा वापर जनतेसाठी करीत आलो. असे मत भापकर यांनी व्यक्त केले.

भापकर पुढे म्हणाले, ‘म्हटले तर माझे सर्वच राजकीय पक्षांशी संबंध आहेत. म्हटले तर कोणत्याच राजकीय पक्षांशी नाहीत. पुढे काय होईल सांगता येणार नाही. पण सध्या तरी मी मराठवाड्याचा प्रशासकीय नेता आहे. हल्ली चांगले प्रशासकीय नेते कमी आहेत आणि म्हणून मी आपल्या पदाचा अधिकाधिक उपयोग लोकांची कामे करण्यासाठी करीत असतो’असे ते म्हणाले.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

डॉ. भापकर यांनी तमाशावर देखील वक्तव्य केले, ते म्हणाले डिसेंबरमध्ये यात्रेत आलेले अनेक तमाशे मी पाहिले. तमाशांमध्ये प्रगल्भता असते. वाईट काहीही नसते. जयश्री काळे- नगरकर या तमाशा कलावंताचा मुलगा नुकताच आयएएस झाला. यापेक्षा मोठा आनंद तो काय असू शकतो. तसेच भापकर यांची मुलगी नुकतीच आयएएस झाली. त्या अनुषंगाने श्रोत्यांमधूनच प्रश्न विचारला गेला. त्यावर भापकर म्हणाले, मी सतत माझ्या मुलांना फ्री हँड देत गेलो. तुमच्या आवडीचं जे जे तुम्हाला करावं वाटतं, ते करा, पण त्यासाठी कठोर परिश्रम घ्या, अशी माझी भूमिका राहत आली. अमृत हास्य क्लबने शेवटी हास्याचे प्रयोग करून दाखवल्यानंतर कार्यक्रम संपला.

Shivjal