कोरोनाच्या लढ्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने भारतासाठी केला मदतीचा हात पुढे

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. अनेक शहरात रुग्णासाठी ऑक्सिजन सिंलीडरची कमतरता भासत आहे. तसेच औषधाचीही कमतरता भासत आहे. अपुऱ्या ऑक्सिजन आणि औषधामुळे अनेक रुग्णाना जिव गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमिवर कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात अनेक मान्यवर व्यक्ती पुढे आल्या आहेत.

मदत करणाऱ्यांच्या यादीयुनिसेफच्या त आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानेही पुढाकार घेतला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने कोविड -१९ रिलीफ फंड मध्ये ५० हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच जवळजवळ २८ लाख ६४ हजार रुपयांची मदत केली आहे. ही सर्व रक्कम कोरोनाविरुद्ध लढ्यात कोरोना टेस्ट आणि ऑक्सिजन साठी वापरण्यात येणार आहे.

या मदतीसोबतच ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने त्यांचे खेळाडू आणि त्यांच्या देशातील सामान्य नागरिकांना देखील युनिसेफच्या कोविड रिलीफ फंट मध्ये मदत करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष निक हॉकले यांनी मत व्यक्त करताना म्हणाले की, ‘भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबध मैत्रीपूर्ण आहेत. क्रिकेट या मैत्रीत महत्त्वाचे केंद्रस्थान आहे. यापूर्वीदेखील ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्स सोबतच ब्रेट ली याने देखील ४२ लाख रुपयांची मदत केली होती.

महत्वाच्या बातम्या