औरंगाबादचे खासदार ठेकेदारांशी बंद दाराआड चर्चा करतात- आ. सतीश चव्हाण

khare and sathish chawan

औरंगाबाद: २० वर्षांपासून शहराचे खासदार असलेले चंद्रकांत खैरे हे प्रत्येक योजनेचे श्रेय घेतात. कच-याचे श्रेय मात्र घेत नाहीत. शहराचे खासदार ठेकेदारांशी बंद दाराआड चर्चा करतात आणि महापालिका आयुक्त बाहेर दिडतास वाट पाहतात. अशा अधिकाऱ्यांनी स्वाभिमानापोटी पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. औरंगाबाद मध्ये आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.

आमदार सतीश चव्हाण, पुढे म्हणाले, आता त्यांना कोणत्यातरी पक्षाकडून उमेदवार व्हायचे असल्यामुळे ते कच-याची जिम्मेदारी घेत असतील. तसेच शहरातील कचरा टाकण्यास विरोध करणा-या मिटमिटा गावातील नागरिकांवर पोलिसांनी अमानुष अत्याचार केले. प्रत्येकाला घरात घुसून मारहाण केली. घरातील सामानाची पोलिसांनी तोडफोड केली. या अत्याचाराचा आदेश देणाऱ्या पोलीस अधिका-यांची मस्ती विधीमंडळात उतरविणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला.