वीजबिल थकबाकी वसुली करण्यात औरंगाबाद परिमंडळ चौथ्या क्रमांकावर

MSEB

औरंगाबाद: महावितरणाची आर्थिक स्थिती कोलमडली आहे त्यामुळे महावितरण आपल्या कर्मचाऱ्यांना घरोघरी पाठवुन वीजग्राहकांकडून थकलेल्या बिलाची रक्कम वसूल करत आहे. जी लोक कर्मचाऱ्यांना प्रतिसाद देत नाहीत त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात असून जी कर्मचारी कामचूकारपना करतात त्यांना दंड ठोठावला जात आहे. ही थकबाकी वसुली जोरात सुरू असून औरंगाबाद परिमंडळाने ३१ मार्चपर्यंत तब्बल २९० कोटींचा आकडा पार करून राज्यात चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

या मोहिमेत १ हजारपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करून थकबाकी वसूल करण्यात येत आहे. १ मार्च २०१८ ते ३० मार्च २०१८ दरम्यान २४ कोटी ५९ लाख ४८ हजारांची थकबाकी शहरातील ५० हजार २३ वीजग्राहकांकडून वसूल करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान ३६ हजार ६०१ वीजग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच ४९३४७ ग्राहकांकडून २४ कोटी ७ लाखांचा भरणा केला आहे. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय, औरंगाबाद परिमंडळ कार्यालय व सर्व स्तरावरील अभियंते, अधिकारी व कर्मचारीसुद्धा वसुलीच्या मोहिमेत सहभागी आहेत.