मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न; संरक्षक जाळ्यांमुळे वाचले प्राण

मुंबई : मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन एका तरुणाने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने खाली लावलेल्या संरक्षक जाळ्यांमध्ये हा तरुण अडकला आणि त्याचे प्राण वाचले. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. लक्ष्मण चव्हाण असे उडी मारणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्रालयात विषप्राषन करून शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली होती. ते प्रकरण आता कुठे निवळत आहे. तोच पुन्हा एकदा मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन या तरुणाने उडी मारली, मात्र सुदैवाने खाली लावलेल्या संरक्षक जाळ्यांमध्ये हा तरुण अडकला आणि त्याचे प्राण वाचले.

या घटनेमुळे मंत्रालयात काही वेळासाठी गोंधळाचं वातावरण निर्माण झाल होतं. त्यानंतर काही वेळात अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांच्या मदतीनं या तरुणाला जाळीवरुन सुरक्षित खाली उतरवण्यात आलं. त्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली जात आहे. दरम्यान या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळालेली नाही.

You might also like
Comments
Loading...