fbpx

‘जवानांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांना किंमत चुकवावी लागणार’

टीम महाराष्ट्र देशा : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाला गालगोट लागले आहे. आज माओवाद्यांनी सी-६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात १५ जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.

गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दानापूरमध्ये माओवाद्यांनी तब्बल ३० वाहने जाळली होती. या घटनेत ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त अधिक मालमत्तेचं नुकसान झालं असल्याची माहिती आहे. माओवाद्यांनी केलेल्या या कृत्यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या गाडीत शीघ्र कृतीदलाचे जवान होते. १५ जवान आणि १ ड्रायव्हर होता. खासगी वाहन होतं. पोलिसांच्या गाड्यांवर हल्ला केला जातो, त्यामुळे खासगी वाहनातून प्रवास सुरु होता, त्यावेळी हा दुर्दैवी प्रकार झाला. एकदंरीत जो प्रकार घडला आहे, त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असं दीपक केसरकर म्हणाले.