हल्लाबोल करणा-यांनी आधी स्वतःचा गल्ला भरला – चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. अजित पवार यांनी हल्लाबोल यात्रेदरम्यान शिवसेनेला गांडूळ म्हटले होते. त्यामुळे चंद्रकांतदानी त्यांच्यावर हल्लाबोल केला.

वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्याच्या निमित्तानं भाजपानं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. दरम्यान, कधी शिवसेनेची बाजू न घेणाऱ्या दादांनी अचानकपणे शिवसेनेची बाजू घेतली. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, शिवसेनेला गांडूळ म्हणणारेच राज्याला लागलेली वाळवी आहे. हल्लाबोल करणा-यांनी आधी स्वतःचा गल्ला भरलाय. भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या असल्याचं म्हणत चंद्रकांत पाटलांनी अजितदादांना टोला लगावला आहे.

महामेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहतांसह दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली आहे.

You might also like
Comments
Loading...