मुंबई: भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी काल (२२ एप्रिल) हल्ला केला. मोहित कंबोज उत्तर भारतीय भवन येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता तेथून परतताना हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. ते कलानगर येथील सिग्नलवर थांबले असता मातोश्री बाहेर असलेल्या शिवसैनिकांनी कंबोज यांच्या गाडीवर शिवीगाळ करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी ठाकरे सरकारवर संताप व्यक्त केला.
“मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद आहे. महाराष्ट्रात सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलाल तर तुम्हाला जिवे मारू, ही नवी संस्कृती सुरू झाली आहे. पण तरीही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही.”, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत दिला आहे.
मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद आहे.
महाराष्ट्रात सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलाल तर तुम्हाला जिवे मारू, ही नवी संस्कृती सुरू झाली आहे. पण तरीही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही@mohitbharatiya_— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 22, 2022
तसेच आता मुंबई पोलिस या हल्लेखोरांवर कारवाई करणार की एखादे कथानक रचून, या भेकड हल्लेखोरांना वाचविणार? मुंबई शहरात आपण सीसीटीव्हीचे जाळे सर्वत्र उभारले आहे, त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येईलच. या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना दोषींवर कठोर कारवाई करावी. अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.
दरम्यान आज (२३ एप्रिल) खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानबाहेर हनुमान चालीसेचे पठण करणार असल्याने आजही या ठिकाणी संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला; ‘मातोश्री’ समोर घडली घटना
- “साहित्यकांमध्ये चिअर लीडर्स तयार झालेत,” ; ज्ञानपीठ विजेते लेखक मावजो यांचे परखड मत
- नवाब मलिकांना मोठा धक्का, पुन्हा न्यायालयीन कोठडीत वाढ!
- सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण : सदावर्तेंना जामीन, ११५ ST कर्मचाऱ्यांना दिलासा!
- “भाजपला मार्केटिंगसाठी ‘सी ग्रेड’ स्टार बंटी बबली लागतात” ; संजय राऊतांची टीका