मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या ‘या’ घोषणेबद्दल रामदास आठवलेंनी मानले आभार

टीम महाराष्ट्र देशा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईतील ज्या बीआयटी चाळीत दोन दशकाहून अधिककाळ राहिले त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी महापरिनिर्वाण दिनी केली होती.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहे. उद्धव ठाकरेंच्या या घोषणेनंतर आठवलेंनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63वा महापरिनिर्वाण दिनी ठाकरे यांनी परेल स्थित बीआयटी चाळीमध्ये जाणून अभिवादन केले होते.तसेच १९१२ ते १९३४ पर्यंत २२ वर्षे ते याठिकाणी राहायला होते.

परेल स्थित बीआयटी चाळीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बराच काळ वास्तव्यास होते.दरम्यान, हे स्मारक अन्याय आणि भेदभावाच्या लढाईत आपल्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. यावेळी अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या बाबासाहेबांचे याठिकाणी स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.

 

महत्वाच्या बातम्या :