आमदाराला लाच देणाऱ्या डेप्युटी सीईओला अटक

आमदार पाटील यांच्या तक्रारीवरून कारवाई

वेबटीम : पंचायत राज समितीचे सदस्य अामदार हेमंत पाटील यांना जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीईअाे तुषार माळी यांनी दीड लाखाची लाच देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले.

तीन दिवसांपासून पंचायत राज समिती जिल्हा दौऱ्यावर होती.गुरुवारी समितीने कापडणे गावात पाहणी केली तेव्हा पोषण आहारात काही त्रुटी आढळून आल्या.याबाबत नाराजी व्यक्त करत समितीने सीईओ गंगाथरन डी.यांना कारवाईचे निर्देश दिले होते.मात्र,याबाबत समितीने साैम्य भूमिका घ्यावी म्हणून समिती सदस्यांना हॉटेलमध्ये गाठून लाच देण्याचा डेप्युटी सीईओ तुषार माळी यांचा प्रयत्न होता.नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांनी या प्रकरणी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती