गौरी लंकेश हत्येप्रकरणी हिंदू जनजागृती समितीच्या अमोल काळेला अटक

gauri lankesh

पुणे: सुप्रसिद्ध पत्रकार आणि बंगळुरू येथील ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांची राहत्या घरी अनोळखी हल्लोखोरांकडून २०१७ मध्ये गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आता पुण्यातील चिंचवड मधून अमोल काळे ऊर्फ भाईसाहब (३७) याला एसआयटीने अटक केली आहे.

गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारने नेमलेल्या एस आय टी ने आणखी चौघांची नावं त्यांच्या अहवालात नमूद केली आहेत. एस आय टी ने अहवालात पुण्यातील पिंपरी – चिंचवडमधील अमोल काळे याच देखील आहे . अमोल काळे हा हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता असल्याच कर्नाटक एस आय टी ने म्हटले आहे. काळे गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता आहे. मात्र तो मागील काही वर्षांपासून घरच्यांच्या संपर्कात नाही . अमोल काळे हा हिंदू जनजगृती समिती आणि सनातन संस्थेच्या वर्तुळात अमोल काळे भाईसाब म्ह्णून ओळखला जातो .

मात्र हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते पराग गोखले यांनी मात्र अमोल काळे हा मागील दहा वर्षांपासून संस्थेच्या संपर्कात नसल्याचं म्हटले आहे.
आता अटक केलेल्या चौघांकडून ४३ मोबाईल फोन आणि सीम कार्ड्स कर्नाटक पोलिसांनी जप्त केली आहेत.

अहवालात नमूद केलेले नावे

  • अमोल काळे – वय ३९ पिंपरी चिंचवड
  • अनिल देगवेकर – वय ३९ गोवा
  • सुजित कुमार – वय ३७
  • मनोहर एडावे -वय २८ कर्नाटक