लोकसभेत मोदी सरकारची परीक्षा, अविश्वास प्रस्ताव मांडण्यास अध्यक्षांची मंजुरी

टीम महाराष्ट्र देशा  : संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच आज दिवशी तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावाला काँग्रेसच्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अन्य विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे.
बुधवारपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी मोदी सरकारची विरोधकांनी कोंडी केली. तेलगू देसम पक्षाने मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडला. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. ‘केंद्र सरकार अपयशी ठरले असून सरकारमुळे शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. देशात दररोज महिलांवर बलात्काराच्या घटना घडत आहे, त्यामुळे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करत असल्याचे त्यांनी सांगितले.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळाला. पावसाळी अधिवेशन 10 ऑगस्टपर्यंत चालणार असून यामध्ये एकूण 18 बैठका होणार आहेत. सरकारसमोर महत्त्वपूर्ण विधेयकं पारित करण्याचे आव्हान आहे, तर दुसरीकडे संसदेत सरकारला चहुबाजूंनी घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी रणनीती आखली आहे.

नाणार प्रकल्पावरून पावसाळी अधिवेशनात शिवसेना सरकारला घेरणार

Karnataka Election; भाजप सत्ता स्थापनेच्या जवळ; काँग्रेसला जोरदार धक्का