विद्यापीठाचे राजकारण आणि कुलगूरूंची ‘बीएचयु’ची नियुक्ती

अभय निकाळजे ( वरिष्ठ पत्रकार ) औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आता राज्यात नाही तर देशात गाजते आहे. कुलगुरुंच्या ‘लहरी महंम्मदी’ कारभाराला कंटाळून त्यांच्या नियूक्तीच्या वावड्या रिकामटेकड्या तहयात विद्यार्थी नेत्यांनी उडवून दिल्या.
कायम दौऱ्यावर असणाऱ्या कुलगुरूंना या विद्यापीठात ज्या पद्धतीने कारभार केला आहे. तो पहाता त्यांना रा. स्व. संघाच्या बालेकिल्ल्यातील बनासर हिंदू विद्यापीठाची चावी या कुलगुरूंना देतील, असे वाटत नाही. तरीही रिकाम टेकड्या तहयात विद्यार्थी नेत्यांनी कुलगुरूंचा बीएचयूचा ‘कार्यक्रम’ लावून दिला.
यापुर्वी कुलगुरूंचे असे अनेक कार्यक्रम याच नेत्यांनी लावले. पण आता या नेत्यांनाच कुलगुरू नको आहेत. म्हणुन त्यांनी हा नवा बीएचयू च्या नियुक्तीचा फंडा काढला. एकतर विद्यापीठात स्थायी असणारे फक्त एकमेव पद आहे, ते म्हणजे कुलगुरूंचे आहे. सगळी महत्वाची पदे अस्थायी स्वरूपाची आहेत. म्हणुन सगळा कारभार कुलगुरुंच्या एक हाती आहे. विद्यापीठाचा सगळा कारभार अधांतरी आहे. म्हणुन विद्यापीठात अनागोंदी वाढली आहे.

हे वाचा – गोंधळलेले कुलगुरू डॉ. बी.ए.चोपडे यांच्या वादग्रस्त कारकीर्दीचा पंचनामा

विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात वादग्रस्त कुलगुरू

You might also like
Comments
Loading...