पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणा म्हणजे फक्त ‘जुमला’- मनमोहन सिंग

modi-manmohan-singh

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणा देखील ‘जुमला’ असल्याचं हळूहळू स्पष्ट होत आहे, असं मनमोहन सिंग म्हणाले.

मनमोहन सिंग म्हणाले, नोटाबंदी आणि जीएसटीची योग्य अमंलबजावणी न झाल्यामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, अनेकांचे व्यवसाय बुडाले, मोदींनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यासाठी देशाचा विकास दर कमीत कमी १२ टक्के होणे गरजेचे आहे, ज्याची कल्पनाही केली जावू शकते नाही.

अर्थव्यवस्था, दहशतवाद, परराष्ट्र धोरण या मुद्द्यांवरून मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर टीका केली. मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी रोजगार उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन देशातील तरुणांना दिलं होतं, मात्र हे सरकार दोन लाख लोकांनाही नोकऱ्या देऊ शकलेलं नाही. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.