चिपळूणच्या नुकसानग्रस्त नागरिकांचा मुख्यमंत्र्यांसमोरच संताप, पाहा व्हिडिओ..

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमध्ये दाखल झाले. चिपळूण व खेडमध्ये पुराचं पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री चिपळूणमधील बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली. तेव्हा तेथील प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी देखील या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत धीर दिला. मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी अनिल परब, भास्कर जाधव, उदय सामंत, सीताराम कुंटे यांची देखील उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांनी स्वतः बाजारपेठेत फिरून पुराच्या पाण्यामुळे झालेले नुकसान पाहिले. बाजारपेठ परिसरात पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले होते. चिपळूण येथील हॉटेल अभिषेकमध्ये मुख्यमंत्री आढावा बैठकही घेणार आहेत.

ठाकरे यांनी बाजारपेठेत जाऊन व्यावसायिक, दुकानदार यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली, त्यांच्याशी बोलले. घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांनी मुख्यमंत्र्यासमोर त्यांच्या व्यथा मांडल्या. तसेच व्यापारी आणि नागरिकांनी नाराजीही व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या