जिओला बहुत अच्छे दिन ! अमेरिकेच्या कंपनीने जिओमध्ये केली मोठी गुंतवणूक

jio

मुंबई : अच्छे दिन असलेल्या रिलायन्स जिओला बहुत अच्छे दिन आले असल्याचं दिसत आहे. फेसबुक, सिल्व्हरलेकनंतर आता अमेरिकेच्या एका कंपनीने जिओमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. जिओमध्ये विदेशातील कंपन्यांनी गुंतवणूक करण्याची ही एका महिन्यातील ही पाचवी वेळ आहे.

जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडमध्ये अमेरिकेच्या KKR नावाच्या कंपनीने 11, 367 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून 2.23 टक्के भागीदारी मिळवली आहे. या कंपनीची ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचं सांगण्यात येत आहे. जिओ प्लॅटफॉर्मचे इक्विटी मूल्य 4.91 लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइझ मूल्य 5.16 लाख कोटी रुपये आहे. आता या करारामुळे जिओला मागच्या महिन्यात गुंतवणूकीसाठी 78,562 कोटी रुपये मिळाले आहेत.

रिलायन्स जिओमध्ये या महिन्यात फेसबुक, सिल्व्हरलेक, विस्टा इक्विटी पार्टनर्स आणि जनरल अटलांटीक या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. रिलायन्स जिओमध्ये 5 कंपन्यांनी 17.12 टक्के भागीदारी मिळवली आहे. यातील सर्वात मोठा भागीदार फेसबुक असून त्यांच्याकडे 9.99 टक्क्यांची भागीदारी आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या असणाऱ्या रिलायन्स जिओ आणि मार्क झुकरबर्ग यांच्या मालकीच्या फेसबुकमध्ये 43 हजार 574 कोटींची ‘मेगा डील’ झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या 

अभिमानास्पद : कोरोनाचा पराभव करण्यासाठी प्राथमिक शिक्षक बनले कोरोना योद्धा !

आनंदाची बातमी : ससूनमध्ये पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी !