राफेल करारावरील आरोप म्हणजे बालवाडीतील पोरखेळ,जेटलींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

rahul-jaitley

टीम महाराष्ट्र देशा– राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी प्रत्येक भाषणात राफेल विमानाची वेगवेगळी किंमत सांगतात, असं जेटली यांनी म्हटलं. शस्त्रक्रियेनंतर राजकारणात सक्रीय झाल्यावर पहिल्यांदाच ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जेटली यांनी राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले.

 

नेमकं काय म्हणाले अरुण जेटली?

राहुल गांधी यांना राफेल करारातील दराबाबत संभ्रम आहे. त्यांनी सात वेळा वेगवेगळी किंमत सांगितली होती. राफेल करारावरील आरोप म्हणजे बालवाडीतील पोरखेळ आहे. मी एका विमानासाठी ५०० कोटी रुपये देत होतो आणि तुम्ही १६०० कोटी रुपये देत आहात, असा त्यांचा आरोप आहे. पण यावरुन त्यांना किती माहिती आहे हे समजते, असा टोला त्यांनी लगावला.