fbpx

परिक्षेदरम्यान विद्यार्थीनींचे कपडे काढून तपासणी प्रकरणात एमआयटी संस्थेने फेटाळले आरोप

mit college

पुणे: बारावीच्या परिक्षेदरम्यान कॉपी लपवल्याच्या संशयाने काही विद्यार्थीनींना कपडे उतरवायला लावल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी स्कूलमधील हा प्रकार आहे. सध्या दहावी बारावीच्या परीक्षा सुरु असून यादरम्यान कॉपी तपासण्यासाठी कपडे काढून झडती घेण्यात आली, असा आरोप दहावीच्या विद्यार्थिनींनी केला आहे. याप्रकरणी दोन महिला सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एमआयटी संस्थेने हे आरोप फेटाळले आहेत.

एमआयटी संस्थेच्या वाटणे आज पत्रकार परिषद घेण्यात आली. मुलींचे कपडे काढून तपासणी केल्याचा आरोप खोटा असून संस्थेने कॉपी करू न दिल्याने संस्थेला बदनाम करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच परीक्षेत कॉपी करु द्यावी म्हणून संस्थेच्या प्राचार्यांना धमकी दिली होती. असा आरोप एमआयटी संस्थेने केला आहे. तसेच या प्रकरणाचा बोर्डाने केलेल्या प्राथमिक स्वरूपाच्या चौकशीत असा प्रकारच घडला नसल्याचं समोर आल्याच संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.