रविकांत तुपकरांचा सदभाऊंवर करोडो रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा : कृषी विभागाकडून देण्यात येणारे खते-बियाने परवाने देण्यासाठी अधिकारी आणि कृषी राज्यमंत्री मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार करत असून आतापर्यंत यामध्ये करोडो रुपयांचा गैरव्यवहार केला असून. परवाने देण्यासाठी करोडो रुपये राज्याचे कृषिमंत्री आपल्या घशात घालत असल्याचा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला आहे.

Loading...

राज्यामध्ये खते, कीटकनाशके, बियाणे उद्योगाची हजारो कोटींची उलाढाल आहे. या उद्योगांना कृषी आयुक्तालयाकडून ऑफलाईन पध्दतीने परवाने दिले जातात. परवाना वाटपात अनियमितता असल्याचा आरोप स्वाभिमानीकडून करण्यात येत आहे. वितरण परवाने पुरवण्यात गुंतलेल्या रॅकेटची चौकशी यापूर्वीच कृषी आयुक्तांकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, सर्व परवाने डिजीटल सिग्नेचर सहीत देण्यात येण्याची मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

परवाने वाटपात करोडोंचा भ्रष्टाचार होत असून यामधून राज्यमंत्री, विभागाचे अधिकारी गुंतलेले आहेत. ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांचे परवाने अडवण्यात आले आहेत. कृषी विभागाने हे परवाने तात्काळ मंजूर करावेत अन्यथा येत्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पवित्रा घेईल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहेLoading…


Loading…

Loading...