पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गर्भपाताचे पुरावे नष्ट होत असल्याचा आरोप

अकलूज : गर्भपात प्रकरणात महाळूंग नेवरे येथे पुरलेले दोन गर्भ सापडले नाहीत. मंगळवारी येथे खोदकाम करण्यात आले. मात्र, पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे पुरावे नष्ट होत असल्याचा आरोप अॅड. वर्षा देशपांडे यांनी केला आहे.

सोमवारी माळेवाडी (अकलूज) हद्दीत खोदकामानंतर एक गर्भ सापडला होता. महाळूंग हद्दीत (मायनर) शेती महामंडळाच्या शिवारात गर्भ पुरलेली जागा सापडल्याने शोधासाठी गेलेले पथक माघारी आले होते. मंगळवारी तहसीलदार माने, पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांच्या समक्ष या ठिकाणी खोदाई करण्यात आली, परंतु येथे गर्भ सापडला नाही. डिसेंबर २०१६ मध्ये गर्भ पुरला होता. त्यामुळे नेमकी जागा लक्षात नसल्याचे गर्भ पुरणाऱ्याने सांगितले. जंगलातील प्राण्यांनी तो उकरला असण्याचीही शक्यता आहे.

bagdure

त्यानंतर हे पथक नेवरे येथील बाबर वस्तीवर गेले. परंतु तिथेही गर्भ सापडला नाही. पुरणाऱ्याने तो गर्भ आपल्या शेतातच पुरला होता. तेथे नांगरणी झाल्याने कदाचित गर्भ नांगरला गेला असण्याचे सांगण्यात आले. डॉ.तेजस डॉ. प्रीती गांधी यांनी ३७ गर्भपात केले होते. सातारा जिल्ह्यातील एक गर्भ याअाधीच सापडला आहे.

उर्वरित ३६ गर्भांपैकी ३३ गर्भ डॉ. गांधी यांच्या यंत्रणेकडून नष्ट केल्याची माहिती समोर येत आहे. क्लीन चिटचा प्रयत्न पोलिसांनी गुन्हा दाखल केला तेव्हाच सर्व जोडपी ताब्यात घेऊन तातडीने गर्भ शोधणे आवश्यक होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळे या प्रकरणातील पुरावे नष्ट होत आहेत. आरोपींना क्लीन चिट देण्यासाठी हे सर्व चालले असेल तर ते खूप घातक आहे. अॅड.वर्षा देशपांडे, सदस्य, राष्ट्रीय आरोग्य तपासणी मूल्यमापन समिती

You might also like
Comments
Loading...