नांदेड : बालविवाह रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने विविध प्रयत्न केले जातात. त्यानुसार बालविवाह प्रतिबंध कायद्यातही अनेकदा बदल करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी मंगल कार्यालये, फोटोग्राफर आणि केटरींगची ऑर्डर घेणाऱ्यांना पत्र पाठवले आहे. त्यानुसार ज्या लग्नाची ऑर्डर तुम्ही घेत आहात, त्यात नवरीचे वय १८ वर्ष तर नवरदेवाचे वय २१ वर्ष पूर्ण असल्याची खात्री करून घ्यावी लागणार आहे. तसे न केल्यास दंड आणि शिक्षेची तरतूद सदरील कायद्यात असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
भारतात मोठ्या प्रमाणात बाल विवाह करण्याची परंपरा होती. मात्र, काळानुरूप त्यात बदल होत गेले. मात्र, आजही अनेक ठिकाणी बाल विवाह होताना दिसून येतात. त्याला प्रतिबंध करण्यासाठी राज्य तसेच केंद्र सरकारच्या पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहे. त्या संबंधीच्या कायद्यातही अनेक बदल करण्यात आले आहे. मात्र, आजही १०० टक्के बालविवाह थांबलेले नाही.
त्यातच आता नवऱ्या मुलीचे आणि नवऱ्या मुलाचे वय तपासायची जबाबदारी फोटोग्राफर, मंगल कार्यालयांचे मालक आणि केटरर्स यांच्या खांद्यावरही टाकण्यात आली आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास सबंधीत व्यक्तीला शिक्षा देखील होवू शकते. त्यामुळे यापुढील काळात बाल विवाहाला काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर संजय राठोड यांची प्रतिक्रिया
- कोरोनाची धास्ती, जालन्यातही शाळा, महाविद्यालय बंद
- बिहार जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीसांकडे आता पश्चिम बंगालची जबाबदारी ?
- शेतकऱ्यांसाठी बदामराव पंडित आक्रमक, महावितरणकडून वीज बिल वसुलीत सवलत
- विशेष पथक लागले कामाला, वाळुचा ट्रक जप्त