गोरोबाकाकांच्या घराबाबत प्रशासनाचा संतापजनक कारभार, जुना बाजही गेला आणि पत्र ठोकून सौंदर्यही घालवले

उस्मानाबाद: संत शिरोमणी त्रगोरोबाकाकाचे राहत्या घरावर कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेले बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून शेवटी ठेकेदारांनी पत्र्याचे शेड टाकले असल्याचे दिसत आहे. पावसाळ्याला अजून तशी सुरुवात देखील नाही झाली तरी देखील पहिल्याच पावसात इथे गळती सुरु झाली आहे. अशा या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे येथील भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

या घराच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील सांस्कृतिक मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नातून काकांचे राहते घर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्यात आले होते. २०१४ साली जेव्हा याची पुनर्बांधणी करण्यात आली होती त्यावर्षीच्या पहिल्याच पावसात या घराच्या भिंतीला तडे गेले होते तसेच पाणी देखील साचायला लागले होते. त्यानंतर पुन्हा त्याची दुरुस्ती करण्यात आली. नोव्हेंबर २०२० मध्ये पाण्याच्या गळतीमुळे माळवदाचा सर कोसळला होता.

आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी या मंदिराला भेट देऊन पाहणी केली होती. पुरातत्व विभागाचा कारभार एवढ्यावरच थांबला नाहीये, मंदिरावर १ कोटी रुपये खर्च करून ३ जून २०२१ मध्ये पत्र्याचे शेड टाकण्यात आले आहे. आता या प्रकरणात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र या चौकशीतून पुढे काय आले याचा अद्यापही खुलासा झालेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

IMP