fbpx

‘या’ अभिनेत्रीला पुन्हा एकदा कन्यारत्न प्राप्त 

टीम महाराष्ट्र देशा :  बॉलीवूड अभिनेत्री इशा देओल काही काळापासून चित्रपटांमध्ये दिसेनाशी झाली आहे. वैयक्तिक आयुष्याची मज्जा घेत आहे. अलीकडेच इशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ईशाने इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ही खुशखबरी चाहत्यांना दिली आहे.प्रेग्नेंसी पूर्वी ती बेबी बंपच्या फोटोंमुळे खूप चर्चेत होती.

या वर्षी जानेवारीत ईशाने आपल्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दलचा खुलासा केला होता. यादरम्यान त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. तिने एक छान चित्र शेअर केले आणि सांगितले की मी पुन्हा आई झाली आहे. १० जून रोजी ईशा आणि तिच्या कुटुंबाने एका छोट्या अतिथीचं स्वागत केले आहे.

शेअर केलेल्या पोस्टरद्वारे, ईशाने तिच्या चाहत्यांचे आभार मानले आणि लिहिले, “या प्रेमाबद्दल आणि आभार मानण्यासाठी सर्व धन्यवाद.” शिवाय, ईशाने आपल्या मुलीचे नाव उघड केले. ईशाने तिच्या मुलीचे नाव मिराया तख्तानी असे ठेवले आहे.