आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ‘या’ अभिनेत्रीने केला भाजपमध्ये प्रवेश

bjp-flag-representational-image

नवी दिल्ली:आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक कलाकार राजकारणात एन्ट्री करत आहेत.सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी अब कि बार जनता कि सरकार म्हणत राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. तर दुसऱ्या बाजूला अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.चॅटर्जी या भाजपकडून लोकसभेची निवडणुकही लढवण्याची शक्यता आहे.

भाजपचे सरचिटणीस कैलास विजवर्गीय यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचं सदस्यत्व घेतलं.2004मध्ये चॅटर्जी यांनी काँग्रेसकडून निवडणुक लढवली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने आपण प्रभावित झाल्यानं भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत मौसमी चॅटर्जी ?

हिंदी आणि बंगाली चित्रपटात मौसमी चॅटर्जी याचं मोठं नाव आहे .राजेश खन्ना, शशी कपूर,जीतेंद्र, संजीव कुमार आणि विनोद खन्नांसोबत देखील त्यांनी उत्तम काम केलं आहे. कच्चे धागे, बेनाम, बालिका वधू, परिणीता अशा चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता.