फेसबुक लाइव्ह करत अभिनेत्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

सुवो चक्रवर्ती

नवी दिल्ली : देशात निर्माण झालेल्या को रोनाच्या संकटामुळे अनेकांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अनेकांचा आशा परिस्थितीमुळे नैराश्याला समोरी जावे लागत आहे. यामुळे कित्येकांनी आत्महत्या चा मार्ग निवडला. सामान्य पासून ते सेलिब्रिटींना देखील या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. यातच आता बंगाली अभिनेता सुवो चक्रवर्ती याने फेसबुक लाइव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. सुदैवाने त्याला यातून वाचविण्यात यश मिळाले.

त्याने फेसबुकवर आत्महत्या करण्याचं कारण सांगितलं होतं. तो वैयक्तिक कारणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चिंतेत होता, त्यातूनच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या यशस्वी प्रयत्नामुळे सुवोला आत्महत्येपासून वाचविण्यात आलं आहे.

सुवोने फेसबुक व्हिडीओचा टायटलमध्ये ‘आय क्विट’ लिहिलं होतं. काम नसल्यामुळे आणि वडिलांच्या मृत्यूमुळे तो त्रस्त होता. आपली चिंता व्यक्त करीत त्यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे सगळे पाहून एका फेसबुक यूजरने फोनवर पोलिसांना संपूर्ण घटनेबाबत माहिती दिली.

यानंतर कलकत्ता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सुवो चक्रवर्ती वाचण्यात यश मिळाले. सुवो चक्रवर्तीकडे गेल्या वर्षीपासून काम नसल्याने ती आर्थिक अडचणीत सापडला होता. सुवोने ‘मंगल चंडी’, ‘इराबोटिर चुपकोथा’, ‘मनासा’ सारख्या बंगाली मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

IMP