‘विहिंप, बजरंग दल सारख्या संघटनांच्या कारवाया भाजप सरकारच्या काळात वाढल्या’

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला

मुंबई : अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सीआयएने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलला ‘धार्मिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. तर आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रवादी संघटना म्हंटल आहे. या अहवालामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, या संघटनांना सरकारचा पाठिंबा असल्याने त्यांच्या गुप्त कारवायांना आळा घालण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न राहिला आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या संघटना हिंसक कारवायांमध्ये सहभागी असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही फक्त सांस्कृतीक संघटना नसून ती एक राजकीय संघटना झाली आहे. संघ आणि संघाशी संलग्न विश्व हिंदू परिषद, बजरंग दलासारख्या संघटनांच्या कारवाया भाजप सरकारच्या काळात वाढल्या आहेत. CIA चा अहवाल पुराव्यानिशी देशातील जनतेसमोर आला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे असे चव्हाण म्हणाले.

bagdure

सीआयएकडून दरवर्षी ‘द वर्ल्ड फॅक्टबुक’नावाने अहवाल जाहीर केला जातो. यामध्ये जगभरातील जगातील 267 देशांची माहिती देण्यात आलेली आहे. या अहवालात विविध देशांच्या राजकीय, सामाजिक, उद्योग तसेच इतर विषयांची माहिती देण्यात येते.
बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक झाले असून दहशतवादी म्हणून केलेला उल्लेख काढावा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सीआयएला दिला आहे.

दरम्यान, आम्ही राष्ट्रवादी असून आम्ही देशाच्या हितासाठी काम करतो. सीआयएनमे ओसामा बिन लादेनची निर्मिती केली त्यामुळे त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याच विहिंपने म्हटले आहे.

You might also like
Comments
Loading...