Share

Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या आरोपीला अखेर अटक, धमकी देण्याचं कारण देखील आलं समोर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता. यामुळे संपूर्ण यंत्रणा अलर्ट झाली होती. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या धमकी मागली कारण समोर आलं आहे.

एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या आरोपीला अटक :

संबंधित आरोपीचं नाव अविनाश आप्पा वाघमारे (Avinash Appa Waghmare) असं असून तो घाटकोपरचा (Ghatkopar) रहिवासी आहे. अविनाश हा ३६ वर्षांचा आहे. लोणावला मधील साईकृपा येथे अविनाश काही माणसांसोबत बसला होता. यावेळी तो दारुच्या नशेत होता. अशातच हाॅटेल मालकांनी पाण्याच्या बाटलीची किंमत जास्त लावल्याने मालकाला त्रास देण्याच्या उद्देशाने अविनाशने १०० वर काॅल केला होता. तसेच एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात येत असल्याची खोटी माहिती अविनाशने पोलिसांनी दिली. मुंबई-बंगळुरु रोडवरील खेड शिवापूर येथे ट्रव्हल्स रोकून त्याला अटक करण्यात आली आहे.

आत्मघातकी स्फोट घडवून जिवे मारण्याचा कट :

शिवसेनेमध्ये (Shivsena) बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी सत्ता मिळवली. एवढेच नाही तर त्यांचा स्वतःचा एक मोठा गट देखील स्थापन केला. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांची जोरदार चर्चा रंगू लागली. अशातच एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जिवे मारण्याचा कट रचण्यात आला असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती.

मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याचं पत्र देखील मंत्रालयाच्या कार्यालयात आलं होतं. त्यानंतर एक निनावी फोन देखील धमकीचा आला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांना माओवाद यांनी देखील जीवे मारण्याची धमकी दिली होती.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. एकनाथ …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics