पुणे: पुण्यातील चाकण पोलीस ठाण्यात एक अजब प्रकार घडला आहे. पोलीस स्टेशनमधील लॉकअपमध्ये असलेल्या आरोपीने पलायन करण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली आहे. या आरोपीने लॉकअपच्या दोन गजांमधील अंतरातून बाहेर पडत पळ काढला होता. परंतु त्याला पुढील दोन तासांच्या आता पुन्हा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
या आरोपीचे नाव कुणाल वीर असे आहे. त्याची शरीरयष्टी बारीक असून तो अतिशय लवचिक असल्याने त्याला असे करणे सहज शक्य झाले. इतर पोलीस स्टेशनमध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून पोलिसांनी एक स्पेशल व्हिडिओ बनवून सर्वत्र जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अधिक माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या: