कोंढव्यातील महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीला वारजेतून अटक

gudyaa murder dhule

पुणे : येथील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात महिलेचा खून करून पसार झालेल्या आरोपीला गजाआड करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले.याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश श्रीकांत गाडे (वय.२२), विलास उर्फ विकी नवनाथ जठार (दोघेही रा.अप्पर इंदिरानगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतील हगवणे नगर, स्काय पार्क बिल्डींगच्या मागे असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये एका महिलेची धारदार शस्त्राने वार करून, डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. तर मृताची ओळख पटू नये म्हणून ज्वलनशील पदार्थ टाकून चेहरा आणि शरीर पेटवून दिलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळाला होता. त्यामुळे सदरील गुन्ह्याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान कोंढवा आणि पुणे शहर पोलिसांसमोर होते. गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी सतीश निकम यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने वारजे माळवाडी येथील एसआरए म्हाडा वसाहतीत लपून बसलेल्या ऋषिकेश गाडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने त्याचा मित्र विकास उर्फ विकी जठार याच्या सहाय्याने सदरील खून केल्याची कबुली दिली. कोंढव्यातील स्कायपार्क इमारतीच्या मागे विकी जठार, त्याचा मित्र आणि राणी नावाची एक मुलगी असे तिघांनी मिळून घटनास्थळी एकत्र बसून मद्यप्राशन केले. यानंतर विकी जठार आणि राणी यांच्यात शाब्दिक वाद झाले. रागाच्या भरात विकी कोयत्याने आणि विकीच्या मित्राने धारदार सुऱ्याने राणीच्या अंगावर आणि तोंडावर वार केले. तर संशयित आरोपी ऋषिकेश गाडे याने विकी जठार याच्या गाडीतून पेट्रोल काढून राणीच्या अंगावर ओतले. यावेळी विकी याने राणीच्या शरीराला आग लावून तेथून सर्वजण पळून गेल्याची कबुली ऋषिकेश गाडे याने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.