खुनाचा आरोपी आणि वेडी माणसं सोडली, तर भाजपमध्ये कोणालाही प्रवेश: हरिभाऊ बागडे

-Haribhau-Bagde.jpg00

टीम महाराष्ट्र देशा : भाजपात खुनाचा आरोपी आणि वेडी माणसं सोडली, तर सध्या कोणालाही सहज प्रवेश मिळतो, अस वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते व विधासभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केल आहे.. भाजपातील ज्येष्ठ नेत्याने या पद्धतीच वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या असणार हे मात्र नक्की .

भाजपातील इनकमिंग म्हणजे काळानुसार झालेला बदल असल्याची टोलेबाजी हरिभाऊ बागडे यांनी केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या 93 व्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या ज्येष्ठ आणि जुन्या ज्येष्ठ नेत्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमात हरिभाऊ बागडे बोलत होते. त्यामुळे भाजपात होणाऱ्या इनकमिंग वर हरिभाऊ बागडे यांनी भाष्य केले आहे.