fbpx

VIDEO- महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पंचाने पक्षपातीपणा केल्याचा आरोप

पुणे – कुस्तीच्या मैदानात पंचाला देवासमान मानले जाते. परंतू अंतिम सामन्यात मात्र पंचाने पक्षपातीपणा केल्याचा आरोप महाराष्ट्र केसरी उपविजेता किरण भगतचे प्रशिक्षक काका पवार यांनी केला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजेता अभिजीत कटके उत्तम खेळला, पण पंचाने नालायकपणा केला. किरण भगतला कुठल्याही परिस्थिती जिंकू द्यायचेच नाही, या विचारानेच पंच मैदानात उतरले होते की काय, अशी शंका उपस्थित केली.

कुस्ती क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटके आणि साताऱ्याच्या किरण भगत यांच्यात अंतिम सामना झाला. पुण्याच्या भूगाव येथे खेळवण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली . अभिजीतने सातारच्या मोही गावच्या किरण भगतला चीतपट करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.

अभिजित कटके आणि किरण भगत यांच्यातील अंतिम लढत सुरवातीला अटीतटीची झाली. मात्र अभिजित कटकेने किरणला चितपट करत 10 विरुद्ध 7 गुणांची आघाडी घेत विजेतेपदावर कब्जा केला. अंतिम फेरीत अभिजीतने साताऱ्याच्या किरण भगतवर १०-७ अशी मात केली. या सगळ्या सामन्यादरम्यान पंचानी दिलेल्या निर्णयांवर आक्षेप घेण्यात आले.

काका पवार यांनी पंचाच्या कामगिरीवर सामन्यानंतर नाराजी व्यक्त केली .कुस्तीच्या सुरुवातीलाच अभिजितने किरणच्या हाताल हिसका दिल्यामुळे किरण मैदानाबाहेर गेला. त्यावेळी पंचानी अभिजितला पॉईंट दिले. दरम्यान अभिजीतने संपूर्ण सामन्यात अतिशय चांगला खेळ खेळला, परंतु पंचाचे काही निर्णय किरण भगतच्या विरोधात गेल्याचे ते म्हणाले.कुस्तीच्या मैदानात पंचाला देवासमान मानले जाते. परंतू अंतिम सामन्यात मात्र पंचाने पक्षपातीपणा केल्याचा आरोप महाराष्ट्र केसरी उपविजेता किरण भगतचे प्रशिक्षक काका पवार यांनी केला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजेता अभिजीत कटके उत्तम खेळला, पण पंचाने नालायकपणा केला. किरण भगतला कुठल्याही परिस्थिती जिंकू द्यायचेच नाही, या विचारानेच पंच मैदानात उतरले होते की काय, अशी शंका उपस्थित केली.