माझ्यावरील आरोप बिनबुडाचे – तृप्ती देसाई

trupti-desai

पुणे : डॉ. विजय मकासरे यांनी केलेले आरोप बिन बुडाचे असून मकासरे यांना जी मारहाण झाली त्याच्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा भूमाता रणरागिणी ब्रिगेड च्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे.

तृप्ती देसाई भूमाता रणरागिणी ब्रिगेड संघटनेच्या नावाखाली लोकांना ब्लॅकमेल करत असल्याचा गंभीर आरोप  डॉ. विजय मकासरे यांनी केला होता. 27 जून रोजी तृप्ती देसाई त्यांचे पती आणि अन्य काही साथीदारांनी मकासरे यांना जबर मारहाण केल्याचा देखील आरोप देसाई यांच्यावर करण्यात आला होता .

यासर्व प्रकारावर देसाई यांच्याशी संवाद साधला असता मकासरे यांनी जे आरोप केले ते सर्व आरोप देसाई यांनी फेटाळून लावले तसेच मकासरे आमच्या संघटनेला बदनाम करण्याचं षडयंत्र रचत असल्याचा आरोप करण्यात आला आहे .

मकासरे यांना जी मारहाण झाली त्या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नसून डॉ. विजय मकासरेच संघटनेच्या नावाखाली लोकांना ब्लॅकमेल करत असल्याचा पलटवार देसाई यांनी केला आहे . आमची संघटना कायद्याचं पालन करणारी असून संपूर्ण कारभार पारदर्शकपणे सुरू असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.

Trupti Desai- तृप्ती देसाई संघटनेच्या नावाखाली लोकांना ब्लॅकमेल करतात- डॉ. विजय मकासरे