‘The Accidental Prime Minister’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित ; कॉंग्रेस कोर्टात जाणार

टीम महाराष्ट्र देशा :  अनेक दिवसापासून अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘The Accidental Prime Minister’ चर्चेत आहे.आज या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवन प्रवासावर आधारित हा चित्रपट असून अनुपम खेर त्यांची भूमिका निभावत आहेत.

हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारू यांचे पुस्तक ‘The Accidental Prime Minister’ यावर आधारित आहे.त्या पुस्तकात त्यांनी २००४ ते २०१४ दरम्यानच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे.चित्रपटात अक्षय खन्ना यांनी संजय बारू यांची तर सुजैन बर्नट यांनी सोनिया गांधी, आहना कुमरा यांनी प्रियंका गांधी आणि अर्जुन माथुर यांनी राहुल गांधीची भूमिका निभावली आहे.

विजय रत्नाकर गुट्टे दिग्दर्शित हा चित्रपट १९ जानेवारी २०१९ ला प्रदर्शित होणार आहे.मात्र त्यापूर्वी मोठा वाद होऊ शकतो. ‘The Accidental Prime Minister’ सिनेमाविरोधात काँग्रेसचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे कोर्टात जाणार आहेत.राजकीय फायद्यासाठी काँग्रेस आणि गांधी घराण्याची बदनामी करण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.