‘रूग्णालयाबाहेर झालेले 600 मृत्यू अद्याप मुंबई महापालिकेने जाहीर केलेले नाहीत’

devendra fadanvis

मुंबई- महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा प्रवास केल्यानंतर आढळलेली वस्तुस्थिती आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात माजी मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवींण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठविले आहे.

यातील मुद्यांवर आपल्याला चर्चा करावी वाटल्यास आपल्याला प्रत्यक्ष भेटून या मुद्यांचे गांभीर्य आणि त्यावरील उपाययोजना इत्यादींबाबत प्रत्यक्ष माहिती देता येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.

मुंबईतील केईएम, नायर आणि सेंट जॉर्ज रूग्णालय, पुणे आणि पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती आणि अकोला, नागपूर, एमएमआर क्षेत्रातील पनवेल, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मिरा भाईंदर तसेच नाशिक, मालेगाव, जळगाव आणि औरंगाबाद इत्यादी ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला होता. या दौर्यानंतर तपशीलवारपणे त्यांनी पत्र लिहिले आहे.

रूग्णालयाबाहेर झालेले 600 मृत्यू अद्याप मुंबई महापालिकेने जाहीर केलेले नाहीत. त्यासंबंधीच्या आकडेवारीची तत्काळ पडताळणी करून ती संख्या जाहीर करण्यात यावी तसेच दि. 10 जुलै 2020 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात मुंबईतील 275 मृत्यू हे अन्य कारणांमुळे झाले, असे दर्शविण्यात आले आहेत.

आयसीएमआरने कोणते मृत्यू कोरोनामृत्यू समजावे आणि कोणते नाही, यासंदर्भात अतिशय स्पष्ट दिशानिर्देश दिले आहेत. असे असताना ते अन्य कारणांमुळे झाले असे दाखविणे योग्य नाही. ते कोरोनाबळींच्या संख्येत दाखविण्यात यावेत, या प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

जगासाठी भारत होणार चीनला पर्याय, गडकरींनी सांगितली ‘आयडियाची कल्पना’

विद्यार्थ्यांना घरूनही अभ्यास करता यावा यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ‘ई-कंटेन्ट पोर्टल’

…मग संघाचा रेशीमबाग परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित का झाला, कॉंग्रेस नेत्याचा सवाल

‘पुढून, मागून कसंही पाहिलं तरी गडी पैलवान काय वाटतं नाही’