5 वर्षाच्या विहानने केला एकट्याने दिल्ली ते बंगरूळ असा विमान प्रवास

vihan

मुंबई : देशात लॉकडाऊनदरम्यान बस, रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर देशांतर्गत विमान सेवाही सुरु झाली आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक विविध भागात अडकून पडले आहेत. ही विमानसेवा सुरु झाल्याने अनेक नागरिक आपल्या कुटुंबियांना भेटत आहेत. मात्र यासर्व घडामोडी घडत असताना आज एक काहीशी आश्चर्यचकित करणारी बाब घडली.

विहान शर्मा हा 5 वर्षाचा मुलगा गेले तीन महिने आई पासून दूर दिल्लीत राहत होता. बंगरूळमध्ये राहणाऱ्या त्याचा आईला भेटण्यासाठी तो आतुर झाला होता. मात्र लॉकडाऊन वाढत गेल्याने तो बंगळुरूला पोहोचू शकत नव्हता. मात्र अखेर आज दिल्लीत अडकलेला पाच वर्षांचा हा मुलगा आज तीन महिन्यांनी विमानाने एकटा प्रवास करून आईला भेटला.

दिल्ली ते बंगरूळ असा त्याने एकट्याने प्रवास केला. खरे तर 5 वर्षाच्या मुलास विमानातून एकटा प्रवास करण्याची परवानगी नसते, मात्र सद्य परिस्थिती लक्षात घेता त्याला तशी परवानगी देण्यात आली. तो ही आईच्या भेटीसाठी एकटा येण्यास तयार झाला. आज सकाळी दिल्ली-बंगळुरू विमानाने तो बंगळुरू विमानतळावर उतरला. इथे त्याची त्याला घेण्यासाठी पोहोचली होती. आईला पाहताच तो तिच्याजवळ धावतच गेला. मायलेकरांची ही भेट आज दिवसभर माध्यमांमध्ये चर्चेत आहे.

कौतुकास्पद : साध्या पध्दतीने विवाह करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली ५१ हजार रुपयाची मदत !

दरम्यान,60 दिवसांनी म्हणजेच दोन महिन्यांनंतर विमानांनी आज टेकऑफ केलं. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी पुण्याच्या दिशेने पहिल्या विमानाने उड्डाण केलं. हे विमान इंडिगोचं होतं. सुरुवातीच्या टप्प्यात 2800 उड्डाणांचं नियोजन करण्यात आलं आहे. आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल वगळता संपूर्ण देशात मध्यरात्रीपासून प्रवाशांची ये-जा सुरु झाली होती. यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावर उत्साह तर होता. परंतु मनात कोरोनाची भीती असल्याचंही काही प्रवाशांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबईवरुन पहिल्या विमानाने पाटणाच्या दिशेने सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी उड्डाण केलं. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 24 मार्चपासून हवाई वाहतूक रोखण्यात आली होती.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही – तृप्ती देसाई