fbpx

‘१९८४ ची शीख दंगल म्हणजे राजीव गांधींच्या आदेशाने झालेला नरसंहार’

टीम महाराष्ट्र देशा : सॅम पित्रोदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना १९८४ मध्ये जे झालं ते झालं, पण मोदींनी मागील पाच वर्षात काय केले ते सांगाव, असे विधान केले होते. पित्रोदा यांच्या विधानानंतर भाजपने कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली होती. सॅम पित्रोदा यांनी १९८४ च्या शीख विरोधी दंगली विषयी केलेले विधान चुकीचे आहे, त्यामुळे त्यांनी देशाची माफी मागायला हवी, अशा शब्दात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पित्रोदांना सुनावले असताना १९८० आयपीएस अधिकारी आणि उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक सुलखान सिंह यांनी केलेल्या वक्तव्याने वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

१९८४  साली झालेली शिख दंगल नव्हती, तर राजीव गांधी यांच्या आदेशावर त्यांच्या विश्वासू काँग्रेस नेत्यांनी स्वतः केलेला नरसंहार होता, असं खळबळजनक वक्तव्य सुलखान सिंह यांनी केलं आहे.शीख दंगली या योजनाबद्ध पद्धतीने झाल्या. लोकांचा संताप असल्यास लगेच दंगली उसळल्या असत्या, पण दंगली २  दिवसानंतर उसळल्या, असं सुलखान सिंह यांनी फेसबूक पोस्ट करुन म्हटलं आहे.

तत्कालीन काँग्रेस नेते भगत, टाईटलर, माकन, सज्जन कुमार मुख्य सूत्रधार होते, असा दावा सुलखान सिंह यांनी केलाय. तसेच मध्य प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवून होते, असं ते म्हणाले आहेत.