Shivsena। मुंबई : आज (मंगळवार) लोकसभेतील शिवसेनेच्या १९ पैकी किमान १२ खासदार स्वतंत्र गट तयार करण्याची शक्यता आहे. या संदर्भात खासदार सभापतींना औपचारिक पत्र सादर करतील. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (शिवसेना) हा मोठा झटका मानल्या जात आहे. यापूर्वी या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. शिवसेनेच्या १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. तसा फोटो समोर आला आहे.
एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर लागलीच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन गटनेता बदलण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी अध्यक्षांना तीन प्रमुख मागण्या केल्या. यामध्ये राहुल शेवाळे यांना लोकसभेचे गटनेते करा, संसद भवनामध्ये नवीन कक्ष कार्यालय या गटाला द्यावे तसेच पक्षप्रतोद म्हणून भावना गवळी यांच्या नावाचे पत्र दिले आहे. त्यालाही लोकसभा अध्यक्षांनी मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.
दरम्यान, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचा विश्वासही या खासदारांनी व्यक्त केला आहे. स्वतंत्र गटासंदर्भात देखील लवकरच निर्णय घेण्याची मागणी देखील लवकरच होईल असा त्यांना विश्वास आहे. यासंदर्भात 12 खासदारांनी पत्र लोकसभा अध्यक्षांना एक पत्र दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर खासदारांनी पुढची रणनिती ठरविल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Om Birla : शिंदे गटात सहभागी झालेल्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली
- Aurangabad and Osmanabad rename controversy | गुगल मॅपकडून औरंगाबादचा संभाजीनगर तर उस्मानाबादचा धारा शिव उल्लेख
- Lok Sabha : शिंदे गटात सहभागी झालेल्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली
- BJP MLA Shweta Mahale : आमदारांच्या आर्थिक फसवणूकीसंदर्भात श्वेता महाले यांच स्पष्टीकरण
- Uddhav Thackeray | “भाजप दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे…”; उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<