Wimbledon 2017: भारतीयांचं आव्हान संपुष्टात, बोपण्णासह सर्व भारतीय स्पर्धंबाहेर

Wimbledon 2017

विम्बल्डन २०१७ स्पर्धेच्या १०व्या दिवशी भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. वरिष्ठ गटात रोहन बोपण्णाला मिश्र दुहेरीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.

काल झालेल्या सामन्यात बिगरमानांकीत बिगर मानांकित हेन्री काँटिनें आणि हेअथेर वॉटसन जोडीने रोहन बोपण्णा आणि गाब्रियेला दाबरोवस्की जोडीला पराभवाची धूळ चारली. दोन तास चाललेल्या या सामन्यात रोहन बोपण्णा आणि गाब्रियेला दाबरोवस्की जोडीला ७-६, ४-६, ५-७ असे पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे रोहन बोपण्णा आणि गाब्रियेला दाबरोवस्की जोडीला स्पर्धेत १० वे मानांकन होते.

कनिष्ठ गटात मुलींच्या दुहेरीत झील देसाई आणि लुलु सून जोडीला द्वितीय मानांकित टेलर जॉन्सन आणि कलैरे लिऊ यांनी १ तास १० मिनिट चाललेल्या सामन्यात ७-५, ६-० असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. झील देसाई आणि लुलु सून जोडी बिगरमानांकीत होती. याबरोबर भारताचे कनिष्ठ गटातील आव्हानही संपुष्टात आले.

यावेळी वरिष्ठ गट आणि कनिष्ठ गट मिळून भारताचे १० पेक्षा जास्त खेळाडू मुख्य स्पर्धेत खेळत होते. परंतु कोणत्याही खेळाडूला उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करता आला नाही.