…म्हणून मी राष्ट्रवादी सोडली, रश्मी बागल यांचे स्पष्टीकरण

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहेत. त्यानुसारच भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाच लावला आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आज सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या राष्ट्रावादी कॉंग्रेस नेत्या रश्मी बागल यांनी शिवसेना प्रवेश केला. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हाती शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. तसेच बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.

Loading...

या पक्षप्रवेशावरून रश्मी बागल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी ‘आमच्या लोकांमध्ये थोडीशी असुरक्षितता होती. पक्ष बदल केला पाहिजे, अशी मागणी त्यांच्यातून होत होती. हे मत लक्षात घेऊनच शिवसेनेत प्रवेश केला आहे असं विधान केले आहे.

तसेच पुढे बोलतना मागच्या लोकसभेला चांगले काम केले होते. विधानसभेतही तन-मन-धन लावून काम केले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चांगले सहकार्य केले आणि कामही केले. आमच्यावर अन्याय झाला असे म्हणणार नाही; परंतु न्याय मिळत नाही, असे लोकांना वाटत असावे. त्यामुळे निर्णय घ्यावा लागला, असंही बागल यांनी स्पष्ट केले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले