‘राज साहेबांना असे भावूक होताना तेव्हाच पाहिलं…’

Ramesh Vanjale

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर पहिलीच विधानसभा निवडणूक होती २००९ ची त्या निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडणून आले होते. त्यात एक आमदार कमालीचा भाव खाऊन गेला आणि तो आमदार होता महाराष्ट्राचे लाडके ‘गोल्डन मॅन’ रमेश वांजळे. पुण्यातील खडकवासला मतदारसंघाचे माजी आमदार स्व.रमेश वांजळे यांचा आज ( 10 जून ) स्मृतिदिन आहे. त्यानिम्मित मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

नाभिक समाजाचे प्रश्न शासनाकडे मांडणार : देवेंद्र फडणवीस

आपल्या जीवनात अनेक लोक येत असतात, परंतु आपल्या मनात खुपच कमी लोक कायमस्वरूपी राहतात, असेच मनात कायमस्वरूपी राहणारे आहेत रमेश वांजळे. आमच्या पक्षाचे पुण्यातील आमदार असलेले रमेश वांजळे यांचा आज स्मृतिदिन, 2009 मधे आमदार झालेले व अतिशय कमी कालावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेले असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. जोरदार शरीर यष्टी लाभलेले वांजळे हे अतिशय मृदू हृदयाचे होते, जेव्हा लोकांना एखाद्याचा आधार वाटतो व त्यांना कोणत्याही संकटात ज्याची आठवण येते तोच खरा नेता. अशा भावना बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केल्या आहेत.

तर, वांजळे हे असेच लोकांना व कार्यकर्त्यांना आपलेसे वाटणारे, कोणत्याही अडचणीत आठवण येणारे . त्यांना सोने घालण्याची प्रचंड आवड, तसेच ते हृदयाने ही एकदम सोनेरी असेच व्यक्तिमत्त्व होते. मी राज साहेबांना अनेक दशकांपासून ओळखतो, साहेब क्वचितच जाहिररित्या आपल्या भावनांना वाट करून देतात, वांजळे यांच्या अंत्यसंस्कार वेळी आपण साहेबांना असे भावूक होतांना पाहिले, यावरून च साहेबांचे वांजळे यांच्यावरील प्रेम लक्षात येते. अशी आठवण सुद्धा नांदगावकर यानीन सांगितली.

ज्या काळात त्यांचे राजकीय क्षितिजावर राज्य करण्याचे वय होते त्या काळात नियतीने त्यांचा घात केला. मी स्वतः माझा एक वैयक्तिक सहकारी नव्हे तर चांगला मित्र गमावला. अजूनही अनेकदा त्यांची प्रकर्षाने आठवण येते, परंतु ते म्हणतात ना गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. अशी खंत बाळा नांदगावकरांनी व्यक्त केली.

रमेश वांजळे यांचा राजकीय प्रवास

रमेश वांजळे यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पंचायत समितीपासून राजकारणास सुरुवात केली. २५ वर्षांहून अधिक काळ राजकारणात असलेल्या वांजळे यांनी २००२ मध्ये हवेली पंचायत समितीचे उपसभापतिपद भूषविले होते. त्यांच्या पत्नीही कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. २००२ ते २००७ या काळात ते हवेली पंचायत समितीचे सदस्य होते. तर त्यापैकी २००२-२००४ या कालखंडात हवेली पंचायत समितीचे उपसभापती होते.

कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री रामकृष्ण मोरे यांचे वांजळे निष्ठावंत कार्यकर्ते होते. २००९ मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. विधानसभेच्या २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत वांजळे यांना खडकवासला मतदारसंघातून मनसेची उमेदवारी मिळाली. ऐनवेळी पक्षबदल करूनही ते पहिल्याच प्रयत्नात चांगल्या मताधिक्‍याने विजयी झाले. २००९ च्या निवडणुकींनंतर भरलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राची अधिकृत भाषा असलेल्या मराठीऐवजी हिंदीतून आमदारपदाची शपथ घेणार्‍या समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांच्यासमोरचा माईक हिसकावून घेतल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते.

जाणून घ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजारीवालांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट काय आला?

अंगावरील अडीच किलो सोन्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या वांजळे यांनी अल्पावधीत महाराष्ट्रात आपली प्रतिमा निर्माण केली होती. हवेली तालुक्‍यातील अहिरे गावचे सरपंच ते खडकवासला मतदारसंघाचे आमदार असा राजकीय पल्ला त्यांनी गाठला. अंगावर सोन्याचे भरपूर दागिने घालत असल्याने त्यांचा उल्लेख काही जण गोल्डमॅन असा करत. १० जून, इ.स. २०११ रोजी हृदयाघाताच्या तीव्र झटक्याने पुण्यात त्यांचे निधन झाले.