भाजप नेत्यासोबत झालेली ‘ती’ भेट राजकीय नव्हती:अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात सकाळी नऊ वाजल्यापासून दिवसभर विविध विभागाच्या बैठका आयोजित केल्या होत्या.

याच दरम्यान भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी अजित पवार यांची भेट घेतली.आणि जवळपास अर्धा तास चर्चा केली होती. त्यावरून माध्यमात चांगली चर्चा रंगली होती. याबाबत अजित पवार यांना पत्रकार परिषदेत विचारले असता ते म्हणाले की, मला सर्व पक्षातील आमदार कामानिमित्त भेटत असतात. त्यानुसार आज प्रसाद लाड सार्वजनिक कामानिमित्त भेटले असून उगाच त्याचा काही वेगळा अर्थ काढू नका. असं पवारांनी यांनी स्पष्ट केलं.

Loading...

यावेळी पवार म्हणाले की, पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याच्या दृष्टीने मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. या दोन्ही शहरात मेट्रो लवकरच धावणार आहे. प्रत्येकाला आपल्या भागात मेट्रो आली पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर मेट्रोचे जाळे पसरविण्यात येत आहे. त्याचा भाग म्हणून पिंपरी चिंचवड येथील नागरिकांनी पुणे मेट्रो नावात बदल करून पुणे पिंपरी चिंचवड महामेट्रो अशी मागणी केली होती. ही मागणी मान्य केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...