ठरलं ! १९ सप्टेंबरपासून रंगणार आयपीएलचा तेरावा हंगाम तर ; फायनल होणार 8 नोव्हेंबरला

IPL

मुंबई : ऑस्ट्रेलियात आयोजित टी-२० विश्वचषकाचे आयोजन आयसीसीने पुढे ढकलले आणि बीसीसीआयला दिलासा मिळाला. आयपीएलच्या १३ व्या पर्वाचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआयचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पण, यासाठी बीसीसीआयने भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरीही बीसीसीआयने यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) तयारीला सुरुवात केली आहे.

१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार असून ८ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली.

”आयपीएल 19 सप्टेंबरला सुरू होण्याची शक्यता अधिक आहे आणि 8 नोव्हेंबर ( रविवारी) अंतिम सामना होईल. आयपीएलसाठी 51 दिवस आम्हाला मिळत आहेत आणि फ्रँचायझी व ब्रॉडकास्टर अन् अन्य भागधारकही या तारखांवर समाधानी होतील,”असे पटेल यांनी PTIला सांगितले. ते पुढे म्हणाले,”51 दिवस मिळत असल्यानं कमीच डबल हेडर सामने होतील. सात आठवड्यांच्या या कालावधीत आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे आम्ही पाचच डबल हेडर खेळवू. त्यामुळे सरावासाठी खेळाडू महिनाभर आधी म्हणजेच 20 ऑगस्टला यूएईला रवाना होतील.”

याआधी २६ सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार असा अंदाज बांधला जात होता. परंतु युएईवरुन भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्याला रवाना होईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आयसीसीच्या नियमांप्रमाणे १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करण्यासाठी आयपीएल स्पर्धा लवकर सुरु करण्याचं बीसीसीआयने ठरवलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी बीसीसीआयने हे पाऊल उचलल्याचं कळतंय. प्रत्येक संघाला सरावासाठी किमान एका महिन्याची गरज असल्यामुळे २० ऑगस्टरोजी संघ युएईसाठी रवाना होतील. त्यानंतर सर्व खेळाडूंना सरावासाठी किमान ४ आठवडे मिळणार आहेत.

रोगप्रतिकारक शक्ती नेमकी वाढवावी तरी कशी ?

सोनू सूदचा पुन्हा एकदा मदतीचा हात, नोकरी शोधण्यासाठी लाँच केलं अॅप

 ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांचे कोरोनामुळे पुण्यात निधन