पुणे :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पुण्यात होणार कि नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण आता या सर्व चर्चांना पुर्णविराम लागला आहे. राज ठाकरेंची सभा पुण्यात २२ मे ला होणार अशी माहिती मनसेकडून देण्यात आली. माहितीनुसार, पुण्यातील गणेश कला-क्रीडा मंच या ठिकाणी सभा होणार आहे.
मनसेकडून यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. पण इथल्या बुकिंगचे पैसे भरल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ही सभा बंदिस्त सभागृहात होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सभेला जास्तीत जास्त नागरिकांना येण्याचे आव्हान करा, सभेमधील गर्दी वाढवण्यासाठी प्रयत्न करा, अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. औरंगाबादमध्ये ज्या प्रकारे सभेची तयारी केली होती, त्याचप्रकारची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अयोध्या दौऱ्याची तयारी सुरु आहे, मुंबईमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठकीची चित्रे पाहायला मिळत आहेत. ही बैठक संपल्यानंतर स्वतः राज ठाकरे ट्विट करून यांदर्भात माहिती देण्याची शक्यता आहे. अयोध्या येथील होणाऱ्या सभेला जास्तीत जास्त नागरिक, पदाधिकारी यांना येण्यासाठी आव्हान करा, अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्या. काल रात्री शिवाजीनगर येथील मध्यवर्ती कार्यालामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. मागच्या अनेक दिवसांपासून पुण्यात मनसेची धुसपूस पाहायला मिळत आहे. पण याबाबत राज ठाकरे काहीही बोलले नाहीत. या झालेल्या सर्व गोंधळानंतर राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना समज देणार का? असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :-