अटकेनंतर राज कुंद्राचा ‘द कपिल शर्मा शो’ मधील तो व्हिडीओ व्हायरल

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फ्रेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

राज कुंद्राला अटक झाल्यानंतर त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘द कपिल शर्मा’ या कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात राज कुंद्रा त्याची पत्नी शिल्पा शेट्टी आणि मेव्हणी शमिता शेट्टी सोबत हजर होता. या कार्यक्रमादरम्यान कपील शर्माने राज कुंद्राला म्हणतो की,’तुम्ही कधी फुटबॉल सामन्यात, कधी शिल्पासोबत खरेदी करताना तर कधी फिरताना दिसतात, पण तुम्ही पैसे कमावता कसे?’ असा प्रश्न विचारला आहे.

या प्रश्नानंतर राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीने पतीची बाजु सावरण्याचा प्रयत्न करत त्याची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. तो खुप मेहनत घेत असल्याचे ती म्हणाली. मात्र अश्लिल चित्रपटाच्या निर्मीतीसाठी राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक करताच हा व्हिडीओ सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडे राज कुंद्रा विरोधात सबळ पुरावे उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP